‘सोडून जाणाऱ्या नेत्यांमुळे पवारांच्या हृदयाचे किती तुकडे होत असतील’ : जितेंद्र आव्हाड

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून मोठ्या प्रमाणात सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत इनकमिंग सुरू आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत माजी गृहनिर्माण राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सचिन अहिर यांनी हाती शिवबंधन बांधले.

सचिन अहिर यांनी राष्ट्रवादीला राम राम करून आज शिवसेनेत प्रवेश केला. ‘निष्ठा, स्वामीनिष्ठा याचा काही संबंध राहिला आहे की नाही ? सत्ता हेच सर्वस्व मानल तर राजकारणात नात,श्वास या गोष्टीना काही अर्थच राहत नाही. ज्यांनी सत्ता दिली, मान सन्मान दिला, आज त्यांच्या हृदयाचे किती तुकडे होत असतील, अशी भावनिक प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते वैभव पिचड हे देखील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस – राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजप – सेना युतीत प्रवेश केला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस भाजप – सेना युतीची ताकद वाढत आहे. तर काँग्रेस – राष्ट्रवादी कमकुवत होताना दिसत आहे.