राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकांपूर्वी धर्मनिरपेक्ष असतात नंतर मात्र ते भाजपला जाऊन मिळतात : प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी ने महारष्ट्रातील जनतेला तिसरा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर हा तिसरा पर्याय जनतेसमोर प्रकर्षाने मांडताना दिसत आहेत. आज बीड येथील सभे मध्ये आपल्या उमेदवाराच्या प्रचारा वेळी प्रकाश आंबेडकर यांनी जमलेल्या समुदायाला युती आणि आघाडी पर्याय सोडून तिसरा पर्याय निवडा असे आवाहन केले तर राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष निवडणुकी पुरताच धर्मनिरपेक्ष असतो नंतर तो भापालाच जावून मिळतो अशी परस्परविरोधी वक्तव्य देखील यावेळी त्यांनी केले.

यावेळी आंबेडकर म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास ठेऊ नका. कारण, निवडणुकांपूर्वी ते धर्मनिरपेक्ष असतात. पण, निवडणुका झाल्यानंतर ते धर्मनिरपेक्ष नसतात. कदाचित, निवडणुका झाल्यानंतर ते भाजपला पाठिंबा देतील, २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीचे उदाहरण देत प्रकश आंबेडकर म्हणाले की, राज्यात देवेंद्र फडणवीस यांचं सरकार बनलं नसतं, जर राष्ट्रवादीनं भाजपाला पाठिंबा जाहीर केला नसता. निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादीला प्रश्न विचारा की, का तुम्ही भाजपाला पाठिंबा दिला होता.

त्यामुळे  राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणुकांपूर्वी धर्मनिरपेक्ष पार्टी असते. तर, निवडणुकांनंतर सेक्युलर पक्षांसोबत आपली तडजोड करतात. अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.जनतेने जर चुकून राष्ट्रवादीला मतदान केलं, तर निवडणुकांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपावासी होईल. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी हा तिसरा पर्याय निवडा असे आवाहन त्यांनी जनतेला केले.