राज्यात साथ देऊ, पण…; राष्ट्रवादीची शिवसेनेसमोर ‘अवजड’ अट

टीम महाराष्ट्र देशा – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ‘याआधीही विधीमंडळाचा सदस्य नसलेली व्यक्ती मुख्यमंत्री झालेली आहे. मग कोणी राज्यसभेचा सदस्य असेल, कुणी लोकसभेचा, असं अजित पवार म्हणाले आहेत. त्यामुळे राज्यसभेचे सदस्य असलेले शरद पवार मुख्यमंत्री होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेनेने सत्ता स्थापन केल्यास आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रीपद मिळू शकते.

मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीने शिवसेनेसह सत्ता स्थापन करण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. यात सर्वात महत्वाची अट म्हणजे शिवसेनेनं भाजपासोबतचे सर्व संबंध तोडावेत. केंद्रात अवजड उद्योग मंत्रालय सांभाळणाऱ्या अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी माहिती राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितल्याचं वृत्त ‘मुंबई मिरर’नं प्रसिद्ध केलं आहे.

दरम्यान शरद पवार यांच्या मुख्यमंत्रीपदावर भाष्य करताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी भाष्य केले आहे. त्यांनी शरद पवार मुख्यमंत्री झाल्यास महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता, विशेषत: शेतकरीवर्ग घरावर गुढी उभारून पवार साहेबांच्या मुख्यमंत्रिपदाच स्वागत करेल. घराघरांमध्ये दिवाळी साजरी केली जाईल असं विधान केले आहे.

दरम्यान, सध्या राज्यात भाजप शिवसेनेत सत्ता वाटपासाठी जोरदार संघर्ष सुरु आहे. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. सत्ता स्थापणेयाविषयी शरद पवार कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे.

महत्वाच्या बातम्या