पुण्याच्या जागेसाठी राष्ट्रवादी पुन्हा एकदा आक्रमक

blank

पुणे – काँग्रेस-राष्ट्रवादीने जागांची अदलाबदल केली आहे. रावेरच्या बदल्यात पुण्याची जागा कॉंग्रेसने राष्ट्रवादीसाठी सोडल्याची माहिती समोर आली आहे.

काही वेळापूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार रावेर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला तर जळगाव मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असे स्पष्ट करण्यात आले होते मात्र आता रावेर मतदारसंघाच्या बदल्यात काँग्रेसने पुण्याची जागा राष्ट्रवादीला सोडली जाणार असल्याची शक्यता आहे.

काँग्रेसने पुण्याची जागा राष्ट्रवादीला सोडल्यास राष्ट्रवादीकडून प्रविण गायकवाड यांना उमेदवारी दिली जाईल, असंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता पुण्याच्या जागेसाठी राष्ट्रवादी पुन्हा एकदा आक्रमक होण्याची चित्रे आहेत.

दरम्यान, पुणे मतदार संघासाठी कॉंग्रेसकडून रोज नवीन नावं पुढे येत असून आज तर या जागेवर लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी हक्क सांगितला आहे. आज त्यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.