आता पवार घुसणार थेट मोदींच्या राज्यात; गुजरातमधील सर्व जागा राष्ट्रवादी लढणार

 टीम महाराष्ट्र देशा: आता शरद पवार थेट मोदींच्या राज्यात आपला पक्ष घुसवणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी गुजरातमध्ये सर्वच्या सर्व जग लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागावाटपाचा वाटाघाटींवर एकमत होऊ न शकल्याने राष्ट्रवादी गुजरात मधील सर्वच्या सर्व २६ जागांवर निवडणूक लढवणार आहे .

दरम्यान, काँग्रेस – राष्ट्रवादी ही आघाडी महाराष्ट्रामध्ये एकत्र निवडणूक लढवणार आहे. महाराष्ट्रात काँग्रेस २६ तर राष्ट्रवादी २२ जागांवर निवडणूक लढवणार आहे. महाराष्ट्रात जरी ही आघाडी एकत्र असली असला तरी गुजरातमध्ये मात्र मध्ये या आघाडीत बिघाड झाला आहे.