fbpx

राष्ट्रवादीवर एका समाजाची मक्तेदारी नाही तर हा बहुजनांचा पक्ष – जयंत पाटील

पुणे : पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याच काम राष्ट्रवादी काँग्रेसकडून केले जात. आमच्या पक्षावर कोणा एका पक्षाची मक्तेदारी नसून सर्वच समाजाला समान न्याय दिला जात असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षावर केल्या जाणाऱ्या टिकेला उत्तर दिले आहे. तसेच येणाऱ्या काळात तालुका आणि जिल्हा कार्यकारणीमध्ये प्रत्येक समाजाच्या कार्यकर्त्यांना स्थान देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीकडून पुण्यामध्ये आयोजित हल्लाबोल सभेत ते बोलत होते

पुढे बोलताना जयंत पाटील यांनी भाजप आणि नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की ‘भाजपचे सबका साथ सबका विकास नाही तर सबका विश्वासघात ही घोषणा आहे. आम्ही ज्या व्यवस्था निर्माण केल्या त्या सर्वांचा वापर करत नरेंद्र मोदी सत्तेवर आले. मोदी जनतेतून नाही तर टिव्हीतून आलेले पंतप्रधान आहेत. तर देशाची अर्थव्यवस्था बुडीत काढण्याचं काम या सरकारने केलं असल्याचा घणाघात देखील जयंत पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, देशात आज सगळेच समाज अस्वस्थ आहेत, मुस्लिमांवर दलितांवर अत्याचार होत आहेत. उनावच्या कुटूंबाला अजूनही न्याय मिळाला नसल्याचा आरोप देखील जयंत पाटील यांनी केला आहे.