राष्ट्रवादीच्या तिजोरीत खडखडाट, आता प्रचार तोंडी करा – पवार

sharad-pawar

टीम महाराष्ट्र देशा- राज्यातील प्रमुख विरोधीपक्ष असणाऱ्या आणि स्थापनेपासून 15 वर्ष सत्तेत राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पैशांची अडचण निर्माण झाल्याचं दिसत आहे, ही कबुली खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. पक्षाच्या तिजोरीत खडखडाट झाल्याने आता निवडणूक प्रचार तोंडी आणि सोशल मीडियावर करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक दोन दिवसांपूर्वी मुंबईत पार पडली, यावेळी बोलताना शरद पवार यांनी भाजपवर निशाणा साधला, भाजपकडे भरपूर पैसे आहे, पण आपल्याकडे पैसाच उरला नसल्याने आता निवडणुकीचा प्रचार लोकांपर्यंत जाऊन तोंडी करणे तसेच सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करून करावा असा सल्ला पवार यांनी दिला आहे.

1999 साली स्थापन झालेला राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्ष सलग 15 वर्षे राज्य आणि केंद्रामध्ये सत्तेत होता. मात्र, सत्ताकाळात आलेला पैसा विकास कामासाठी झाल्याने पक्षाकडे पैसे नसल्याचा दावा नेत्यांकडून केला जात आहे. तर सत्ताकाळात मंत्री आमदार राहिलेले नेतेही निधी देत नसल्याची ओरड केली जात आहे.