राष्ट्रवादीने केलेल्या विकास कामांमुळेच पुणे शहर एक नंबरवर : चेतन तुपे

ncp

टीम महाराष्ट्र देशा :  देशातील 111 शहरामध्ये जगण्यायोग्य शहराच्या यादीमध्ये पुणे शहराला पहिला तर नवी मुंबई ला दुसरा क्रमांक मिळाला आहे.ही आनंदाची बाब आहे.या दोन्ही शहरात मागील पंधरा वर्ष राष्ट्रवादीची सत्ता होती.तिथे अनेक विकास कामे आणि पायाभूत सुविधा देण्यात आल्या आहे.त्यामुळे पुणे शहराचा प्रथम क्रमांक आणि नवी मुंबईचा दुसरा क्रमांक आला आहे असल्याचा दावा पुणे महानगरपालिका विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी केला आहे.

तुपे यांनी या कामाचं श्रेय पवार कुटुंबियांना दिलं. शरद पवार साहेब,आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनामुळे मागील पंधरा वर्षात पुणे शहराचा चेहरा मोहरा बद्दलता आला.याचा मला सार्थ अभिमान आहे.या सर्व कामाची पावती म्हणून 111 शहरामध्ये पुण्याचा एक नंबर आला आहे.हे केवळ राष्ट्रवादीमुळे शक्य झाले असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

देशांत जगण्यायोग्य शहरांमध्ये पुण्याने अव्वल क्रमांक पटकावला आहे. तर नवी मुंबई आणि मुंबईने अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे या यादीत पहिल्या तिन्ही क्रमांकावर महाराष्ट्राने मोहोर उमटवली आहे. तर पहिल्या ५० शहरांच्या या यादीत देशाची राजधानी असलेल्या दिल्लीला स्थान मिळू शकलेलं नाही.

हे सर्वेक्षण देशातील १११ शहरांमध्ये करण्यात आले. शहरांची निवड करताना संस्था, प्रशासन, सामाजिक पायाभूत सुविधा यात शिक्षण आणि आरोग्य त्याचबरोबर आर्थिक घटक आणि पायाभूत सुविधा या घटकांचा विचार करण्यात आल्याचे केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीप सुरी यांनी सांगितले. या यादीत चेन्नईला १४ वा क्रमांक मिळाला आहे. कोलकाताने सर्वेक्षणात भाग घेण्यास नकार दिला होता.

केंद्रशासित प्रदेशांचा विचार केल्यास केवळ चंदिगडला पहिल्या दहा शहरांमध्ये स्थान मिळवण्यात यश आलं आहे. चंदिगडला पाचवा क्रमांक मिळाला आहे. आंध्र प्रदेशातील तिरुपती आणि विजयवाडा ही शहरंदेखील पहिल्या दहांमध्ये आहेत. त्यांना अनुक्रमे चौथा आणि नववा क्रमांक मिळवण्यात यश आलं आहे. देशातील शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचं जीवनमान सुधारावं, यासाठी केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास खात्याकडून जगण्यायोग्य शहरांची यादी प्रसिद्ध केली जाते. शहरातील संस्था, प्रशासन, मूलभूत सुविधांचा दर्जा लक्षात घेऊन जगण्यायोग्य शहरांची यादी तयार केली जाते.

राजपथावर झळकणार महाराष्ट्राच वैभव