‘पूर आला तेव्हा राष्ट्रवादीवाले मसनात गेले होते काय ? – सदाभाऊ खोत

टीम महाराष्ट्र देशा : ‘पूर आला तेव्हा राष्ट्रवादीवाले मसनात गेले होते काय ? , पाण्यात उतरले असते तर स्वागत केलं असतं’ अशी घणाघाती टीका राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केली आहे. राष्ट्रवादीला पूरग्रस्तांशी देणघेणं नसून ते केवळ कोरडी सहानुभुती दाखवत आहेत. असा आरोप सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केला आहे.

या पुराचं राजकारण करू नये. हे संकट निसर्ग निर्मित आहे. भविष्यकाळात अस संकट आल्यास सक्षमपणे तोंड देण्यासाठी नियोजन करावं लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला या पुराशी देणंघेणं नाही. त्यांना राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे. हे काम राष्ट्रवादी मोठ्या तडफेन करत आहे. कारण पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. त्यामुळं कोरडी सहानुभूती दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे. अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

Loading...

तर मदत न करता विभागात फिरायचं, भाषणं द्यायची, मुलाखती देत फिरायचं असं त्यांचं काम आहे. पुढील आमदारकीच्या जागा कशा वाढतील, या दृष्टीन राष्ट्रवादीवाले काम करत आहेत. ज्यावेळी पूर आला तेव्हा आले असते, पाण्यात उतरले असते, चार दोन बोटी घेऊन आले असते तर स्वागत केलं असत. लोकांचे अश्रू पुसायचा त्यांचा कार्यक्रम नाही. लोकांची मन भडकवून सरकार विरोधी वातावरण तयार करायचं काम राष्ट्रवादीवाले करत आहेत असा आरोपही त्यांनी केला.

यावेळी सदाभाऊ खोत यांनी मावळ गोळीबाराचा उल्लेख केला. “शेतकऱ्यांचा इतकाच पुतळा असता तर मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार झाला नसता. तेव्हा शेतकऱ्यांवरचं प्रेम कुठे गेलं होतं ?”, असा सवाल सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीला विचारला आहे वर्ध्यात स्वातंत्र्यदिन सोहळ्याला मंत्री सदाभाऊ खोत आले होते.त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा चांगलाच समाचार घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या 

माझा अन त्यांचा बांधाला-बांध आहे तरीही जयंत पाटलांविरोधात मीच लढणार – सदाभाऊ खोत

मुख्यमंत्रीपदावरून सदाभाऊ खोतांचा उद्धव ठाकरेंना टोला

आंदोलनाच्या शाळेतील मी पहिला मास्तर आहे : सदाभाऊ खोत

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
'आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचा दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन'
मी 'गमतीजमती' सुरु केल्या तर, तुमच्या मदतीलाही कोणी येणार नाही : अजित पवार
जगात शिवसेनेएवढे 'नीच' राजकारण कोणीच करू शकत नाही
इंदुरीकर महाराज तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका : रुपाली पाटील- ठोंबरे
टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य दुर्दैवी : खासदार सुप्रिया सुळे
इंदुरीकर महाराज हे महाराष्ट्रातले 'खूप मोठे कीर्तनकार' ; तृप्ती देसाई आणि अंनिस संघटना हे 'धर्म नष्ट' करायला निघाले आहेत
लढवय्या इंदुरीकर महाराजांचा निर्धार, किर्तनाचा वसा सोडणार नाही...
इंदुरीकर महाराज तुम्ही कीर्तन सोडू नका,संयम ठेवा,अवघा महाराष्ट्र आपल्या सोबत आहे : बानगुडे पाटील