विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीने केले पुण्याच्या संघटनेत मोठे बदल

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुणे शहराच्या संघटनेमध्ये विविध बदल केले आहेत. पुणे शहरामध्ये राष्ट्रवादीचे महिला, युवक, विद्यार्थी, युवती, अल्पसंख्यांक, कामगार अशा समाजातील विविध घटकांमध्ये काम करण्यासाठी संघटना व सेल आहेत या संघटनाच्या अध्यक्षांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज नवीन नेमणुका करण्यात आल्याची घोषणा शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार वंदना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या नव्या नेमणुका करण्यात आल्या. नवीन  नेमणुका करत असताना पूर्वीच्या संघटनेच्या व सेलच्या शहराध्यक्ष यांना त्याच्या विभागाच्या प्रदेश कार्यकारीणीमध्ये प्रमोशन देण्यात आले आहे. तसेच काही लोकांना पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारणीमध्ये बढती देण्यात आली त्यामुळे पूर्वीच्या संघटनेच्या शहराध्यक्षांचा केलेल्या कामाचा अनुभवाचा उपयोग महाराष्ट्र प्रदेश पातळीवर पक्षाला होईल व नवीन चेहऱ्यामुळे संघटना बांधणी अधिक मजबूत करता येईल.

Loading...

इतकेच नव्हे तर नेमणुका करताना सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्याचे धोरण पक्षाने अवलंबिले आहे.त्याचप्रमाणे पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघाचा ताळमेळ या नियुक्त्यांमध्ये करण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी दिली.

नवनिर्वाचित अध्यक्षांची नावे

 • राष्ट्रवादी महिला काँग्रेस स्वाती पोकळे
 • राष्ट्रवादी युवक काँग्रेस महेश हांडे
 • राष्ट्रवादी विद्यार्थी विशाल मोरे
 • राष्ट्रवादी युवती काँग्रेस अश्विनी परेरा
 • राष्ट्रवादी अल्पसंख्यांक काँग्रेस अजीम गुडाकुवाला
 • राष्ट्रवादी कांग्रेस कामगार सेल राजेंद्र कोंडे
 • राष्ट्रवादी काँग्रेस पर्यावरण सेल समीर निकम
 • राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक सेल प्रमोद रणवरे
 • राष्ट्रवादी काँग्रेस आयटी सेल ययाती चरवड
 • राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नागरिक सेल शंकर शिंदे
 • राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया सेल सुकेश पासलकर
 • राष्ट्रवादी काँग्रेस पथारी सेल अल्ताफ शेख
Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण