नेते स्टेजवर तर महापुरुषांच्या प्रतिमा खाली; हा महापुरुषांचा अपमान नव्हे का?

ncp nashik photo

 अहमदनगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वापरलेल्या अपशब्दाचे प्रकरण ताजे असतानाच दुसरीकडे आणखीन एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. नाकर्त्या सरकारला जागेवर आणण्यासाठी म्हणून सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उत्तर महाराष्ट्रात हल्लाबोल यात्रा काढण्यात आली आहे. आज नाशिक जिल्ह्यातील सटाना येथे जाहीर सभेच आयोजन करण्यात आल होत. सभेवेळी स्टेजवर नेत्यांची बरीच मोठी मांदियाळी देखील होती. मात्र, याच दरम्यान नेते स्टेजवर आणि थोर महापुरुषांच्या प्रतिमा स्टेजपेक्षा कमी उंचीच्या टेबलवर ठेवण्यात आल्या होत्या. सध्या हेच फोटो व्हायरल झाले असून हा महापुरुषांचा अपमान नाही का असा प्रश्न विचारला जात आहे

.

Loading...

सटाना येथील सभेवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक दिग्गज नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सभा ठिकाणी भला मोठा स्टेज उभारण्यात आला होता. प्रामुख्याने महापुरुषांच्या प्रतिमा ठेवण्यासाठी संबंधित स्टेजवरच थोड्या उंचीच्या ठिकाणी व्यवस्था करणे हे गरजेच आहे. मात्र अस न करता स्टेजपुढे एक टेबल ठेवून त्यावर सर्व प्रतिमा ठेवण्यात आल्याच संबंधित फोटोमधून दिसत आहे. यामुळे नेते स्टेजवर तर थोरमहापुरुष आणि दिवंगत नेते आर. आर पाटील यांचा फोटो खालच्या बाजूला हेच चित्र यातून दिसत आहे.

 

याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेस नाशिक जिल्हाअध्यक्ष रवींद्र पगार म्हणाले कि, कार्यक्रम सुरु झाल्यानंतर मी थोड्या वेळाने पोहचलो, सर्व महापुरुष आणि दिवंगत नेते यांच्याबद्दल आमच्या मनात तीव्र आदर आहे. स्टेजवर नेत्यांची गर्दी असल्याने या महापुरुषांच्या प्रतिमा स्टेजच्या पुढे वेगळी व्यवस्था करून लोकांना दिसतील अशा ठेवण्यात आल्या होत्या. महापुरुषांचे फोटो ठेवताना उंचीचीदेखील काळजी घेतली जाईल

दरम्यान या सर्व प्रकरणावर ‘महाराष्ट्र देशा’ने राज्यातील अनेक व्याख्यात्यांची यावर प्रतिक्रिया विचारली असता बहुतांश लोकांनी ही कृती चुकीची असल्याच मत नोंदवल आहे. तसेच स्टेजबद्दल लिखित प्रोटोकॉल नसला तरी महापुरुषांचे फोटो ठेवत असताना स्टेजवर आपल्या उंचीपेक्षा थोड्या मोठ्या टेबलवर दर्शनी ठिकाणी  ठेवण गरजेच असल्याच मत नोंदवल आहे.

‘सरकार नाही भानावर राष्ट्रवादी उतरली रस्त्यावर’ हा नारा देत हल्लाबोल यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेच्या दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वच नेते सरकारवर कडाडून टीका करत आहेत. सरकारच्या कामावर नाराज असलेल्या जनतेचा मोठ्या प्रमाणात या यात्रेला पाठींबा मिळत आहे. मात्र आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी महापुरुषांचा सन्मान राखण्याच भान ठेवणे गरजेच आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
मराठा क्रांती मोर्चाचा पहिला बळी ' मी ' ठरलो : आमदार भारत भालके
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
रडत राऊतांमुळे यापुढे सामना बंद,बंद,बंद : मनसे
माझं कुणी काहीच ' वाकडं ' करू शकत नाही : संजय राऊत