fbpx

६ मे पासून सुरु होणार राष्ट्रवादीच्या ‘हल्लाबोल’चा पाचवा टप्पा

hallabol

मुंबई : राज्य आणि केंद्र सरकारविरोधात सुरु असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. नुकताच या आंदोलनाचा चौथा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात पार पडला आता या आंदोलनाचा पुढचा म्हणजेच पाचवा टप्पा ६ मे पासून सुरु होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

दरम्यान, हल्लाबोल आंदोलनाच्या पाचव्या टप्प्याची सुरुवात पालघर जिल्ह्यातून होणार आहे. ६ आणि ७ मे रोजी पालघर आणि ११ ते १३ मे रोजी ठाणे जिल्ह्यात हे आंदोलन पार पडणार असल्याचं तटकरे यांनी म्हटलं आहे. तसेच १ ते ५ जून रोजी सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात हल्लाबोल आंदोलन होणार असल्याचं ते म्हणाले आहेत. दरम्यान या आंदोलनात राष्ट्रावादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार, विधानपरिषेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, यांच्यासह ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत.