VIDEO: आई भवानीच्या दारी गोंधळ मांडून ‘हल्लाबोल’ला सुरवात !

पहा गोंधळातून कसा केला भाजप सरकारवर 'हल्लाबोल'

टीम महाराष्ट्र देशा: सरकारला झोपेच्या सोंगातून जागं करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आई भवानीच्या दारी गोंधळ मांडला आणि आपल्या दुसऱ्या टप्प्यातील हल्लाबोल आंदोलनाला उस्मानाबाद येथून सुरवात केली आहे.

विनाअट आणि सरसकट शेतकरी कर्जमाफी, दूध आणि शेतीमालासाठी हमीभाव, विषारी औषध फवारणीमुळे बळी गेलेल्या शेतकरी कुटुंबियांना मदत, आरक्षण इत्यादी मागण्या यावेळी करण्यात येत आहेत.

या आंदोलनात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, आमदार अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत.

31 जानेवारीला या आंदोलनाचा समारोप होईल. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित राहणार आहेत. याआधी राष्ट्रवादीने 1 ते 12 डिसेंबर या काळात पहिलं हल्लाबोल आंदोलन केलं होतं.

पहा गोंधळातून कसा केला भाजप सरकारवर ‘हल्लाबोल’