कर्जतमध्ये राम शिंदेना आमदार रोहित पवारांकडून जोरदार धक्का !

blank

कर्जत – जामखेड : भाजपाकडून कर्जत पंचायत समिती हिसकावून घेत राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले. कर्जत पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादीच्या सौ. अश्विनी शामराव कानगुडे यांची बिनविरोध निवड झाली. तर उपसभापतिपदी हेमंत मोरे यांची निवड झाली. यामुळे नवनिर्वाचित आमदार रोहित पवारांनी माजी मंत्री आणि भाजप नेते  राम शिंदेना पुन्हा पराभवाचा धक्का दिला.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालेले असतानाच कर्जत तालुक्यात मात्र शिवसेनेच्या एकमेव सदस्याने भाजपाबरोबरच राहण्याचा निर्णय घेतला परंतु विद्यमान सभापती ऐनवेळी गैरहजर राहिल्याने भाजपचे संख्याबळ घटले.

राष्ट्रवादीकडून सभापतीपदासाठी सौ. अश्विनी श्यामराव कानगुडे तर उपसभापती पदासाठी हेमंत मोरे यांनी अर्ज दाखल केले.  भाजपा- सेना युतीच्यावतीने सभापतीपदासाठी सौ. ज्योती प्रकाश शिंदे तर उपसभापतीपदासाठी शिवसेनेचे प्रशांत बुद्धिवंत यांनी अर्ज दाखल केला होता .

छाननी नंतर चारही अर्ज वैध ठरले परंतु अर्ज माघारी घेण्याचा वेळी सभागृहात आठ पैकी सातच सदस्य उपस्थित होते. सहा महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीमधून भाजपात जाऊन सभापती झालेल्या सौ. साधना कदम अनुपस्थित राहिल्यामुळे भाजपाचे संख्याबळ घटले .

यामध्ये युतीकडे भाजपाकडे दोन व सेनेचा एक, असे तीनच सदस्य राहिल्यामुळे त्यांचा सदस्यांनी आपले अर्ज मागे घेतले, यामुळे अधिकारी अर्चना नष्टे यांनी सभापतिपदी सौ. अश्विनी शाम कानगुडे यांची तर उपसभापतिपदी हेमंत मोरे यांची बिनविरोध निवड जाहीर केली.