विकासाच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला पाठिंबा दिला-महाजन

blank

अहमदनगर: नगर महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी करत शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवलं आहे.या निवडणुकीत राष्ट्रवादीनेही महापौर पदासाठी उमेदवारीचा फॉर्म भरला असताना ऐनवेळी माघार घेऊन भाजपला पाठींबा दिला.त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणावरही उमटत आहेत.राष्ट्रवादीच्या या नगरसेवकांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीसही पाठवण्यात आली आहे.त्याच पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचीही प्रतिक्रिया आली आहे.

नेमकं काय म्हणाले गिरीश महाजन ?

विकासाच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला पाठिंबा दिला. त्यामुळेच आम्ही पाठिंबा घेतला. या स्थानिक निर्णयाचा लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीवर काहीही परिणाम होणार नाही. शिवसेनेही अनेक ठिकाणी काँग्रेसशी युती करत जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये सत्ता स्थापन केली आहे. त्याचा राज्यपातळीवर परिणाम होत नाही. नगरमध्ये झालेली आघाडी स्थानिकच आहे. राज्याच्या राजकारणावर त्याचा परिणाम होणार नाही’ अशा शब्दात त्यांनी या राजकीय नाट्याचे समर्थन केले.