सांगोल्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का, ‘या’ युवा नेत्यानं धरली भाजपची वाट

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस आघाडीच्या अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश करण्याचा धडाका लावला आहे. तर आता सोलापूर जिह्यातील आणखी एक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. सोलापूरमधील सांगोला येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते चेतनसिंह उर्फ बाळासाहेब केदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. चेतनसिंह यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा धक्का सहन करावा लागणार आहे.

चेतनसिंह हे विद्यमान नगरसेवक आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आहेत. माजी उपनगराधक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणात चेतनसिंह यांचे चांगले वर्चस्व आहे. तसेच युवकांचा मोठा पाठींबा असल्याने चेतनसिंह यांचा भाजपप्रवेश हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मोठे नुकसान मानले जात आहे. पंढरपूरमध्ये होणाऱ्या भाजप मेळाव्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

Loading...

दरम्यान काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक आमदार येत्या आठवड्याभरात राजीनामा देणार असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या गौप्यस्फोटानंतर चेतनसिंह यांच्या रुपाने राष्ट्रवादीला हा पहिला धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
भिडेंच्या सांगली 'बंद'ला राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ जाणार बेळगावात
राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर पोलिसांच्या ताब्यात
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
भाजपचा 'हा' नेता भेटला अजित पवारांना;राजकीय तर्कवितर्कांना उधान
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ