fbpx

राष्ट्रवादीने मागविले विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांचे अर्ज

supriya ajith

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत. राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ( फेसबुक ) यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. सर्वच पक्षांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी अनेक इच्छुक उमेदवार आहेत. याचदरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत. राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ( फेसबुक ) यासंदर्भात माहिती देण्यात आली असून, अर्जाची प्रतही देण्यात आली आहे.

राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारी अर्जाची प्रोसेस ?

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २०१९ मा. प्रदेशाध्यक्ष आ. श्री. जयंत पाटील – जयंत पाटील यांनी राज्यातील २८८ विधानसभा मतदार संघासाठी इच्छुक उमेदवारीकरीता खालील प्रमाणे कार्यक्रम जाहीर केलेला आहे.

१) अर्ज करण्याची अंतिम तारीख १ जुलै, २०१९
२) मा. जिल्हाध्यक्षांकडे अर्ज जमा करुन प्रदेश कार्यालयाकडे पाठविणे
३) प्रदेश कार्यालयाकडे ईमेलव्दारे थेट अर्ज [email protected]
वर करावा.
४) आलेल्या अर्जांची छाननी दि. ३ जुलै, २०१९
५) इच्छुक उमेदवारांची अंतिम यादी जुलैच्या दुस-या आठवड्यात करण्यात येईल.
६) अर्जासोबत अनामत रक्कम अ) खुला प्रवर्ग ५०००/ ब) राखीव प्रवर्ग २५००/
क) महिला २५००/
७)अर्जासोबत अनामत रक्कमेचा धनादेश महाराष्ट्र प्रदेश नॅशनॅलिस्ट काँग्रेस
पार्टी किंवा इंग्रजीमध्ये (Maharashtra Pradesh Nationalist Congress Party) या नावाने काढावा.
८) ईमेल व्दारे अर्ज करणा-यांनी खालील बँक खात्यावर आर.टी.जी.एस. ने
अनामत रक्कम भरावी. खाते नाव :- महाराष्ट्र प्रदेश नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी किंवा इंग्रजीमध्ये (Maharashtra Pradesh Nationalist Congress Party)
बँकेचे नाव | :- बँक ऑफ महाराष्ट्र शाखा
नरिमन पॉईंन्ट चालू बँक खाते :- २०००७६०१९८२
IFSC Code
MAHB0001006
९) अनामत रक्कम न भरल्यास अर्जाचा विचार होणार नाही.

शिवाजीराव गर्जे
सरचिटणीस
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

विधानसभा निवडणूक उमेदवारीसाठी अर्ज प्रति,
मा. अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र प्रदेश
ठाकरसी हाऊस, जे.एन.हेरेडिया मार्ग, बॅलार्ड ईस्टेट, मुंबई.