कोल्हापूर राष्ट्रवादीला धक्का, राष्ट्रवादीच्या माजी खासदार शिवसेनेत

टीम महाराष्ट्र देशा – राष्ट्रवादीच्या माजी खासदार आणि महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा श्रीमती निवेदिता माने यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी शिवबंध बांधून घेत अखेर निवेदिता माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले कि, पश्चिम महाराष्ट्रातून सुरु झालेली वारी संपूर्ण महाराष्ट्र भर पसरेल व महाराष्ट्रात सगळीकडे भगवा फडकेल.

मागच्या काही दिवसापूर्वीच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर  मातोश्री निवेदिता माने यादेखील शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा होती. अखेर आज त्यांनी शिवसेनेत कार्यकर्त्यासह प्रवेश केला.

मुंबई येथील शिवसेना भवन येथे राष्ट्रवादीच्या माजी खासदार व अखिल भारतिय महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा श्रीमती निवेदिता माने यांच्या शिवसेना प्रवेशाच्या कार्यक्रमात श्री ठाकरे बोलत होते. यावेळी शिवबंध बांधून घेत अखेर निवेदिता माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी निवेदिता माने यांच्यासह शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित होते. त्यावेळी पक्षप्रमुख ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधण्यात आले.