राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडगिरी; ओव्हरटेक करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण

पुणे: कारला ओव्हरटेक केल्याच्या रागातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी नगरसेवकाच्या मुलाने एकाला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. मारहाण करणारा हा माजी नगरसेवक प्रमोद निम्हण आणि माजी नगरसेविका सुषमा निम्हण यांचा मुलगा आहे.

वरुण देसाई या तरुणाने औंध भागात निम्हण दाम्पत्याच्या 17 वर्षीय मुलाच्या कारला ओव्हरटेक केले होते, याचा राग आल्याने निम्हण यांच्या मुलाने त्याच्या  मित्रांसह वरूनला बेदम मारहाण केली, यामध्ये त्याचे नाकाचं हाड फ्रॅक्चर झाले आहे.

दरम्यान, पोलसांनी निम्हण याचा मुलगा आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे, तर आणखीन दोघांचा शोध घेतला जात आहे. माजी नगरसेवक प्रमोद निम्हण हे 2007 साली, तर सुषमा निम्हण या 2011 साली राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकिटावर महापालिका निवडणुकीत विजयी झाल्या होत्या.

You might also like
Comments
Loading...