fbpx

‘खावटी कर्जमाफी म्हणजे सरकारचा आदिवासींना भुलवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न’

विक्रमगड – रविंद्र साळवे : आदिवासी अल्प भूधारक शेतकरी आणि शेतमजुरांना आदिवासी विकास महामंडळाकडून खावटी कर्जापोटी देण्यात आलेले 244.60 कोटींचे कर्ज आणि त्यावरील 116.57 कोटींचे व्याज अशा एकूण 361 कोटी 17 लाख रुपयांची रक्कम माफ करण्यास घोषणा सरकारने केली आहे परंतु यावर राष्ट्रवादीचे पालघर जिल्हा अध्यक्ष व आदिवासी महामंडळाचे संचालक सुनील भुसारा यांनी सडकून टीका केली आहे.मागील 4 वर्षात सरकारने खावटी कर्जे का माफ केले नाही .? असा सवाल त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे उपस्थिती करत निवडणुक जवळ आल्याने आदिवासी मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले परंतु राष्ट्रवादी पक्ष सरकारचे अपयश परिवर्तन निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून जनते समोर आणले जात आहे.

पुढे बोलताना सुनील भुसारा म्हणाले, ‘अच्छे दिन करत हे सरकार सत्तेत आले परंतु मोदी व फडणवीस सरकारने अच्छे दिन कुठे आहेत, असा सवाल त्यांनी विचारला आहे.निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन हे सरकार धूळफेक करण्याचा प्रयत्न करत आहे. पालकमंत्री विष्णू सवरा स्वतःच्या मतदार संघात दुष्काळाची कठीण परिस्थितीत असताना मात्र जव्हार मोखाडा हे तालुके दुष्काळा पासून वंचित ठेवले आहे पालकमंत्री विक्रमगड सह संपूर्ण जिल्ह्यात अपयशी ठरले असल्याने 2019 च्या निवडणुकांमध्ये जनताच त्यांना सतेतून पायउतार करेल असही ते यावेळी म्हणाले.

1 Comment

Click here to post a comment