स्वतंत्र दिव्यांग विकास विभाग निर्मिती विचाराधीन – धनंजय मुंडे

मुंबई: दिव्यांग व दिव्यांगाच्या समस्या हे विषय दुर्लक्षित होत असल्याने, या विषयाकडे विशेष लक्ष देण्यात येईल. त्यासाठी दिव्यांग विकास विभाग स्वतंत्र करण्याबाबत सकारात्मक असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

दिव्यांग व्यक्तीसाठी स्वतंत्र दिव्यांग विकास विभाग निर्मिती प्रक्रियेच्या अनुषंगाने खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या पुढाकाराने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले.

Loading...

मुंडे म्हणाले, दिव्यांग विकास विभागाकरिता एक स्वतंत्र यंत्रणा उभी करावी. त्याद्वारे प्रत्येक दिव्यांगाला शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. या विभागाने कामाच्या व्याप्तीमध्ये वाढ करुन विभागाला प्रतिष्ठा मिळेल असे काम करायला हवे. दिव्यांगाकरिता राज्य शासनामार्फत 5 टक्के निधीचा वापर योग्य रितीने होतो की नाही हे तपासले पाहिजे. विभागातील रिक्त पदांची संख्या, दिव्यांगत्वाचे एकूण प्रकार, एकूण निधी, दिव्यांगांसाठी विविध योजना याबाबतचा प्रस्ताव तयार करावा, असेही मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

या बैठकीस शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेशकुमार वाघमारे, दिव्यांग कल्याण आयुक्त श्रीमती प्रेरणा देशभ्रतार, सामाजिक न्याय विभागाचे सह सचिव दिनेश डिंगळे, माजी सनदी अधिकारी बाजीराव जाधव, टीस संस्थेच्या श्रीमती संध्या लिमये, वैशाली कोल्हे, सल्लागार समीर घोष , विजय कान्हेकर, डॉ संतोष मुंडे तसेच दिव्यांग विकास महामंडळाचे अधिकारी व संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी विविध अधिकाऱ्यांनी दिव्यांग विकास विभाग निर्मितीबाबत सूचना केल्या.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश
परभणीच्या 'त्या' शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच केला एसएमएस, त्यांनतर जे घडले...
भारताचा 'हा' स्टार गोलंदाज पोलिसी वर्दीत करतोय कोरोनाबाबत जनजागृती
आनंदवार्ता : पुण्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढली, डॉक्टरांवर होतोय कौतुकाचा वर्षाव
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
अभिनेते ऋषी कपूर यांची मागणी, 'संध्याकाळपुरते तरी दारुची दुकानं उघडा...'
देशातील 10 बँकांचे होणार विलीनीकरण, १ एप्रिलपासून प्रक्रियेला होणार सुरवात
#corona : केवळ लॉकडाऊन पुरेसे नाही, WHOने सुचवला आणखी एक पर्याय
फैसला ऑन दि स्पॉट , संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दादांनी दिला दिलासा