NCP | मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात वातावरण तापले आहे. या वक्तव्यावर भाजपचे बहुतांश नेते मौन बाळगून आहेत. या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते चांगलेच आक्रमक असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यपालांची पाठराखण केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी देखील यावर गोलमाल उत्तरे दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेश तपासे म्हणाले, “भारतीय राज्यघटनेने दिलेले मुलभुत अधिकारांच रक्षण तसेच राज्य शासनाला वेळोवेळी मार्गदर्शन करने हे राज्यपालाचे कर्तव्य आहे. दुर्दवाने महाराष्ट्राचे राज्यपाल वेगळ्याच वादात व्यस्त आहेत. अनेक वेळा काही ना काही वक्तव्य करून जनतेचा रोष ओढवून घेतात आणि त्यामुळे राज्याचे सामाजिक समीकरण हे बिघडतं चालेल आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांने तस करू नये किंबहुना देशाच्या राष्ट्रपतींनी त्यांना तशी समज द्यावी अन्यथा त्यांची बदली इतर राज्यात करावी.”
विरोधक आक्रमक!
अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले, “राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) व भाजप प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली पाठराखण निश्चितच प्रत्येक शिवप्रेमींना दुःखदायक वाटणारी आहे. त्यांच्या भूमिकेचे समर्थन कशासाठी?”
विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील कोश्यारींवर निशाणा साधला आहे. ३ वर्षे महाराष्ट्रात राहूनही राज्यपालांना महाराष्ट्रातील जनतेच्या भावना समजत नसतील तर त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदी राहू नये, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Vijay Hazare Trophy | इंग्लंडला मागे टाकत तामिळनाडूने लिस्ट ए क्रिकेटमध्ये रचला नवा विक्रम
- Amol Mitkari | “सुधांशू त्रिवेदी ज्या दिवशी महाराष्ट्रात येतील… ”; शिवरायांबाबत केलेल्या विधानावरून अमोल मिटकरी आक्रमक
- Indonesia Earthquake | इंडोनेशिया भूकंपाने हादरला , 44 जणांचा मृत्यू तर 300 हून अधिक लोक जखमी
- Aditya Thackeray | “…म्हणून त्यांचं वरळीवर जास्त लक्ष!”, आदित्य ठाकरेंचं वरळीकरांना भावूक पत्र
- Sambhajiraje Bhosale | त्रिवेदींची पाठराखण करण्यावरुन संभाजीराजे देवेंद्र फडणवीसांवर संतापले, म्हणाले…