राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर;हातकणंगलेची जागा राष्ट्रवादीने स्वभिमानीला सोडली

 

मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रातील 48 पैकी 22 जागांवर निवडणूक लढणार आहे. त्यातील 10 जागांवर उमेदवार आणि हातकणंगलेच्या जागेवर राजू शेट्टींना पाठिंबा राष्ट्रवादीने जाहीर केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार

सुप्रिया सुळे- बारामती

उदयनराजे भोसले- सातारा

धनंजय महाडिक- कोल्हापूर

संजय दिना पाटील -उत्तर पूर्व मुंबई

सुनील तटकरे- रायगड

राजेंद्र शिंगणे- बुलढाणा

गुलाबराव देवकर- जळगाव

राजेश विटेकर- परभणी

अनंत परांजपे- ठाणे

बाबाजी पाटील- कल्याण

मोहोम्मद फैजल- लक्षद्वीप

राजू शेट्टी- हातकणंगले (स्वभामनी संघटना)