fbpx

राज्याची अवस्था ‘शेतकऱ्यांची स्मशानभूमी’ अशी का झाली? – राष्ट्रवादीचा सवाल

टीम महाराष्ट्र देशा : शेतकरी आत्महत्येवरून राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारवर निशाणा साधला आहे. आज राज्याची अवस्था ‘शेतकऱ्यांची स्मशानभूमी’ अशी का झाली? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या NCP या ऑफिशियल ट्विटर अकॉउंट वरून हा सवाल केला आहे.

आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे, सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. याचदरम्यान विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. विरोधकांनी शेतकरी कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या वरून सरकारवर निशाणा साधला. सत्ताधाऱ्यांच्या शेतकरी विरोधी व फसव्या धोरणांमुळे राज्यातील १२ हजार ६३१ शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागली. अशी टीका राष्ट्रवादीने केली.

इतकेच नव्हे तर, सरकारची संवेदनाशीलता कुठे गेली? तसेच आज राज्याची अवस्था ‘शेतकऱ्यांची स्मशानभूमी’ अशी का झाली? असा सवालही राष्ट्रवादीने केला.