दबावशाही, झुंडशाही हे शिवसेनेचं वैशिष्ट्य; महाडेश्वर प्रकरणावरून राष्ट्रवादी आक्रमक

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या आठवड्यात सांताक्रूज पटेलनगर येथे विजेच्या धक्क्याने माय-लेकाचा मृत्यू झाल्यानंतर नागरिकांनी रास्ता रोको केला होता. त्यावेळी मुंबईचे महपौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी एका महिलेचा विनयभंग केला असल्याचं प्राकरण समोर आले होते. परंतु पिडीत महिलेने ‘आम्ही हातांची साखळी करून महापौरांना रस्त्यात रोखले असता महाडेश्वर सरांनी फक्त माझा हात बाजूला केला, त्यांनी माझा हात पिरगळला नाही असे त्या महिलेने स्पष्ट केले होते.

त्या महिलेने ‘महापौर विश्वनाथ महाडेश्वर सरांनी माझा हात पिरगळला नाही. त्यांनी माझा विनयभंग केलेलाच नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रश्नच येत नाही. काही राजकीय पक्ष चुकीचा प्रचार करत आहेत. महाडेश्वर यांनी एका महिलेचा विनयभंग केला, त्यांनी महिलेचा हात मुरगळला’ असा संदेश प्रसारित करणारा “व्हिडीओ व्हायरल करण्यामागे एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असून त्यामागे विश्वनाथ महाडेश्वर सरांची बदनामी करणं हा त्यांचा हेतू आहे.

या प्रकरणावरून राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी आता या महिलेवर दबाव आणून तिला माघार घेण्यास भाग पाडले आहे. ही दबावशाही, झुंडशाही हे शिवसेनेचं वैशिष्ट्य आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौरांची तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसने केली आहे.