भाजप म्हणजे ‘भारतीय जमीन पक्ष’, राष्ट्रवादीची भाजपवर टीका

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय जनता पार्टी सध्या पक्षविस्तार करत आहे. यात भाजपने सदस्य नोंदणी अभियान सुरु केले आहे. तसेच भाजप देशात वेगवेगळ्या ठिकाणी पक्ष कार्यालयेही उभारणार यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपवर टीका केली आहे.

भाजपला प्रदेश कार्यालये उभारण्यासाठी जमीन लागणार आहे. यावर टीका करताना ‘भाजपाने देशभरात पक्षाची ऐसपैस कार्यालये उभारण्यासाठी जमिनी खरेदी करण्याचा सपाटा लावला. देशात सहाशे ठिकाणी भाजपा कार्यालये उभारण्यात येणार असल्याचं म्हटलं जातंय. यासाठी मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी सुरू आहे अस राष्ट्रवादी कॉंग्रेसने म्हटले आहे.

दरम्यान, देशभरात असे जवळपास दोन हजार कोटी रुपये किंमतीच्या जमिनीचे व्यवहार करण्यात आले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आता भारतीय जमीन पक्ष झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.