‘दगडात देव शोधणारा नेता कुणीकडे अन् रयतेलाच देव मानणारा आमचा नेता कुठे ?’

टीम महाराष्ट्र देशा : केदारनाथ मंदिराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भेट दिली. यावेळी त्यांनी दर्शन घेत ध्यानसाधना सुद्धा केली. त्यांच्या या ध्यानसाधनेचा राष्ट्रवादी कॉंग्रेसने चांगलाच समाचार घेतला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून एक व्हिडीओ पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी इलेक्शन प्रचाराचा थकवा दूर करायला केदारनाथ येथे गुहेत जाऊन बसले अन् आपले पवारसाहेब वोटिंग केल्यावर क्षणभरही न थांबता दुष्काळग्रस्त गावांच्या दौऱ्यावर धावून गेले. दगडात देव शोधणारा नेता कुणीकडे अन् रयतेलाच देव मानणारा आमचा नेता कुठे? असा घानाघाती टोला लगावला आहे.

तसेच, देशाचे पंतप्रधानच आचारसंहितेचा भंग का करतात? पंतप्रधानांना श्रमपरिहारासाठी किंवा आध्यात्मिक उन्नतीसाठी एखाद्या पवित्र स्थळी जायचा पूर्ण अधिकार आहे. परंतु ते खासगी पद्धतीने केलं असतं तर ग्रेसफुल वाटलं असतं. कॅमेरा व मीडियाचा लवाजमा घेऊन याची इव्हेंट केल्याने काय साधलं? अशी टीका सुद्धा राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे.

Loading...

दरम्यान, मैं, मेरी तन्हाई (और कॅमेरामन)… ज्ञानसाधनाही इतक्या थाटामाटात करतात हे मोदी साहेबांमुळे जगाला कळलं असणार. निवडणुकींच्या निकालानंतर देशाला यांच्यापासून मुक्ती मिळो इतकीच प्रार्थना! या आशयाचे ट्विट धनंजय मुंडेंनी करून धनंजय मुंडे यांनी देखील नरेंद्र मोदींची खिल्ली उडवली आहे.

Loading...

केदारनाथ येथील गुहेत आज रात्रभर पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्यानधारणा करणार आहेत.

Loading...