सत्तेच्या गुळाला पक्षबदलू मुंगळे चिकटणारच ; राष्ट्रवादीचा राधाकृष्ण विखेंना टोला

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेसचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसने निशाणा साधला आहे. सत्तेच्या गुळाला पक्षबदलू मुंगळे चिकटणारच अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांच्या ट्विटर अकाउँट वरून केली आहे.

विखे पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. विखे पाटील यांनी अनेक वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीत मी जाहीरपणे युतीचा प्रचार केला आहे, त्यामुळे भाजप प्रवेश हा मुद्दा आज राहिलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेचं समर्थन करीत त्यांच्या विचारांची भूमिका घेऊन माझी वाटचाल सुरु आहे, असे विखे पाटील यांनी म्हंटले.

Loading...

इतकेच नव्हे तर, विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर विखेंची मंत्री मंडळात वर्णी लागणार असल्याची चर्चाही सुरु आहे यावरही त्यांनी भाष्य केले. मंत्रिमंडळ विस्ताराचा दिवस कधी आणि मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, असे त्यांनी म्हंटले. याचमुद्यावरून, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला. मंत्रिपदाची लालूच दाखवली तर सत्तेच्या गुळाला पक्षबदलू मुंगळे चिकटणारच, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
सलमान अजूनही कतरीनाच्या प्रेमात स्वत:च दिली कबुली