ओबीसी असल्यामुळे मला सभागृहात बोलू दिल जात नाही; राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा धक्कादायक आरोप

पुणे : पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक असलेले योगेश ससाणे यांनी मी ओबीसी असल्यामुळे मला सभागृहात बोलू दिल जात नाही असा धक्कादायक आरोप केला आहे. संदर्भात महापौर मुक्ता टिळक यांना निवेदन देऊन सभात्याग केला.

दरम्यान, गुरुवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरु असताना ससाणे यांनी बोलू दिल जात नसल्याच्या कारणावरून सभात्याग केला. ते प्रभाग क्रमांक २३ मधून निवडून आले आहेत. सभागृहात शहरातील खड्ड्यांवर चर्चा सुरु होती. त्यावेळी त्यांनी अनेकदा हात उंचावून बोलू देण्याची विनंती केली. मात्र त्यांना संधी देण्यात आली नाही. त्यामुळे ते सभागृहाबाहेर गेले.

मी ओबीसी असल्यामुळे मला बोलू दिल जात नसल्याचं पत्र त्यांनी महापौरांना दिले. ससाणे यांच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठ आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

You might also like
Comments
Loading...