नगर SP कार्यालय तोडफोड प्रकरण : अटकेतील नगरसेवकाचा मृत्यू

टीम महाराष्ट्र देशा : अहमदनगरमध्ये राजकीय वैमनस्यातून दोन शिवसैनिकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ते वसंत ठुबे शनिवारी सुवर्णनगर परिसरात एकत्र होते. यावेळी त्यांच्यावर गोळीबार करुन गुप्तीनेही वार करण्यात आले. यावेळी नगरचे आमदार संग्राम जगताप यांना चौकशीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावले असता त्यांच्या समर्थकांकडून पोलीस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी अटकेत असलेले अहमदनगर महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्वीकृत नगरसेवक कैलास गिरवले यांचा मृत्यू झाला आहे.

Loading...

कैलास गिरवले यांना अहमदनगर पोलिस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणात अटक करण्यात आली होती. काही दिवसांनंतर त्यांची तब्येत खालावली आणि त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे आधी अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले होते.

कैलास गिरवलेच्या मृत्यूनंतर बाबासाहेब गिरवले यांनी पुण्यातील बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये अहमदनगर पोलिसांच्या विरोधात तक्रार दिली आहे. कैलास गिरवलेंच्या मृत्यूला अहमदनगर पोलिस कारणीभूत असून, त्यांना पोलिसांनी कोठडीत मारहाण केली, असा आरोप बाबासाहेब गिरवले यांनी केला आहे.

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...