fbpx

महापौरांना चक्क कचऱ्याची भेट

mukta tilk

पुणे आणि पुण्याचा कचरा हे नेहमी गाजणारे वादाचे  मुद्दे आहेत, आता पुन्हा एकदा  कचरा  प्रश्न पेटण्याची चिन्हे असून हडपसर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक योगेश ससाणे यांनी आज महापौर मुक्ता टिळक यांना कचऱ्याची भेट देत हडपसरमध्ये रामटेकडी येथे महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या मिश्र कचरा प्रक्रिया प्रकल्पाला विरोध केला.

मंगळवारी पुणे महापालिकेच्या हद्दीतील हडपसर येथील रामटेकडी येथील रॉकेम प्रकल्पात पाठविण्यात येणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या अडवून सनदशीर मार्गानी गाड्या परत पाठून स्थानिक नगरसेवक योगेश ससाणे आणि नागरिकांनी हडपसर येथे आंदोलन केले

हडपसरमध्ये रामटेकडी येथे महापालिकेच्या वतीने 700 टनाचा मिश्र कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केला जाणार आहे. त्याचे काम सुरू होताच हडपसर मधील स्थानिक नगरसेवकांनी नागरिकांच्या माध्यमातून या प्रकल्पाला विरोध सुरू केला आहे. असे असताना देखील प्रशासन आणि सत्ताधारी तिथेच प्रकल्प उभारण्यावर ठाम आहेत.