काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्रित येऊन निवडणुका लढविल्यास सत्तापरिवर्तन- मोहिते पाटील

टीम महाराष्ट्र देशा- केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात जनमानसात प्रचंड नाराजी असून काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्रित येऊन निवडणुका लढविल्यास निश्चितच सत्तापरिवर्तन होईल, असं मत राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

सोलापूरजवळील तिऱ्हे येथे हुरडा पार्टीसाठी आले असता त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. आर्थिक उलाढालीच्या संदर्भात राज्यात चौथ्या क्रमांकावर असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आगामी निवडणुकीत सत्ता राखण्यासाठी दोन्ही काँग्रेसने एकत्र येण्याची गरज आहे. त्यासाठी दोन्ही पक्षातील स्थानिक नेत्यांनी मतभेद व मनभेद संपुष्टात आणल्यास विरोधकांना कोणत्याही प्रकारचा राजकीय लाभ घेता येणार नाही .केवळ खोटय़ा घोषणा करून जनतेची दिशाभूल करायची, हाच एककलमी कार्यक्रम भाजपने राबविल्यामुळे जनतेत सरकारबद्दल रोष असून काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्रित येऊन निवडणुका लढविल्यास निश्चितच सत्तापरिवर्तन होईल असा विश्वास मोहिते-पाटील यांनी व्यक्त केला आहे

You might also like
Comments
Loading...