Share

Chandrashekhar Bawankule । “बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ बंद पडणार” ; बावनकुळेंचे प्लॅनिंग काय?

(Chandrashekhar Bawankule) पुणेः  आमदार रोहित पवारांनी भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा डाव आखत असल्याचा दावा केला होता. मात्र फोडा-तोडा ही वृत्ती राष्ट्रवादी काँग्रेसची आहे, असा प्रत्यारोप बावनकुळे यांनी केला. खेड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांनी आज भाजपात प्रवेश केला. याप्रसंगी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. यावेळी त्यांनी बारामतीत घड्याळ बंद पडणार असल्याचा दावा केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर देखील बावनकुळेंनी अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आजपर्यत याला फोड, मार त्याला तोड ही वृत्ती अवलंबली. आयुष्यभर पंतप्रधान बनण्याचे स्वप्न पाहिले मात्र कधीच पंतप्रधान बन शकले नाही. पुढे भविष्य माहित नाही”, असा टोला त्यांनी पवारांना लगावला. पुढच्या निवडणुकीत पुणे जिल्हा परिषदेवर भाजपाचीच सत्ता आणून अध्यक्षपदही भाजपाकडे येणार असल्याचा दावाही चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला.

बारामतीत घड्याळ बंदच पाडणार, अशी घोषणा त्यांनी केली आहे. तसेच बारामतीनंतर खेड आळंदीही आमच्या टार्गेटवर असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलंय. पुण्याच्या ग्रामीण भागातील राष्ट्रवादी काँग्रेस बालेकिल्ला असलेल्या खेड आळंदी विधानसभा मतदार संघात भाजपाने पक्ष बळकटीसाठी कार्यकर्ता मेळावा  घेतला. राष्ट्रवादीचं होमग्राउंड समजल्या जाणाऱ्या भागात मेळावा घेत बावनकुळेंनी बारामतीत घड्याळ बंद पाडण्याचं वक्तव्य केलं आहे.

या मेळाव्यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला. दरम्यान , चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्याला शरद पवार काय उत्तर  देतात याकडे सर्वांचं लक्ष लागेलेलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

(Chandrashekhar Bawankule) पुणेः  आमदार रोहित पवारांनी भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा डाव आखत असल्याचा दावा केला होता. मात्र फोडा-तोडा ही वृत्ती …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics Pune

Join WhatsApp

Join Now