fbpx

‘मी गृहमंत्री असण्याबाबत केलेलं विधान हे राजकीय गुन्हेगारीसाठी होतं , मुंडेंचे स्पष्टीकरण

टीम महाराष्ट्र देशा : बीडमध्ये घडलेल्या ऑनर किलिंगच्या घटनेवर पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘बीडमधील ही घटना चुकीचीच आहे, त्याचं समर्थन होऊ शकत नाही,’ असं म्हणत याप्रकरणात योग्य कारवाई होईल, असं आश्वासनही पंकजा यांनी दिलं आहे.

दरम्यान पंकजा मुंडेनी काही दिवसांपूर्वीच आपण बीडच्या गृहमंत्री आहोत, अशा आशयाचं विधान केलं होतं. या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या की, ‘मी राजकीय गुंडगिरीविषयी भाष्य केलं होतं, बीडची घटना ही गुन्हेगारी आहे. त्याचा इथं संदर्भ देऊन आपण बीडच्या घटनेचं गांभीर्य कमी करतोय.’

तर , स्वत:ला बीडच्या गृहमंत्री म्हणणाऱ्या पंकजा मुंडे कुठे आहेत, असा अप्रत्यक्ष सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी विचारला होता. बीडमध्ये बहिणीने प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरुन, भावाने बहिणीच्या नवऱ्याला तिच्या डोळ्यांदेखत भररस्त्यात धारदार शस्त्राने वार करत संपवलं. बीड जिल्ह्यातील गांधी नगरातील या घटनेमुळे राज्यभरात थरकाप उडाला आहे. नवऱ्यावर भररस्त्यात वार झाले असताना, पीडित पत्नी मदतीसाठी याचना करत होती, मात्र तिला मदत मिळाली नाही.

2 Comments

Click here to post a comment