…तरचं ‘निवडणुकीवेळी बरी आमची आठवण आली’ असं मतदार म्हणणार नाहीत – शरद पवार

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कार्यकर्त्यांची कार्यशाळा घेतली आहे. आत्तापासून मतदारांच्या घरी पोहचा, म्हणजे निवडणुकीवेळी मतदार म्हणणार नाही, बरी निवडणुकीला आमची आठवण आली. असा सल्लाही शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.

लोकसभा निवडणूक पार पडली, निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला दारूण पराभव स्वीकाराव लागला आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकाही आवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. सर्व पक्षांनी मोर्चे बांधणी सुरु केली आहे. याचदरम्यान, शरद पवार यांनी गुरुवारी पुण्यात कार्यकर्त्यांची बैठक घेतली.

आयोजित बैठकीत, विधानसभा निवडणुकीला केवळ तीन-साडेतीन महिन्यांचा अवधी राहिला आहे. त्यामुळे आळस झटकून पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागा. असा सल्लाही पवारांनी दिला. तसेच, आत्तापासून मतदारांच्या घरी पोहचा. म्हणजे निवडणुकीवेळी मतदार म्हणणार नाहीत, बरी निवडणुकीला आमची आठवण आली. असे म्हणत पवारांनी कार्यकर्त्यांचे कानही टोचले.

याचबरोबर, जनसामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठवा, संघाच्या लोकांसारखी जिद्द आणि चिकाटी शिका असा सल्लाही त्यांनी दिला.