शरद पवारांचा नाशिक दौरा रद्द, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बोलावली तातडीची बैठक

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिक दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक दौरा रद्द करुन शरद पवार मुंबईकडे रवाना झाले आहेत. उद्या त्यांनी राष्ट्रवादीच्या १६ मंत्र्यांची अत्यंत तातडीची आणि महत्त्वाची बैठक बोलावली आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या तपासावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी यांच्यातले मतभेद समोर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी मंत्र्यांची बैठक बोलावल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

घटनेनुसार कायदा आणि सुव्यवस्थेचा अधिकार हा राज्य सरकारचा आहे. त्यामुळे एल्गार प्रकरणाच्या चौकशीचा अधिकार राज्य सरकारलाही पोहोचतो, असं सांगतानाच काही तरी लपवण्यासाठीच केंद्र सरकारने हे प्रकरण एनआयएकडे दिलं, असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. ते जळगाव येथे बोलत होते

Loading...

दरम्यान, केवळ लिखाण केलं म्हणून देशद्रोहाचे गुन्हे दाखल करणं योग्य नसून त्याचीही चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही पवार यांनी केली. तसेच या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी मतभेद नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र पवारांच्या मनात नक्की काय चाललंय याचा वेध घेण भल्या भल्यांना जमलेलं नाही त्यामुळे पवारांच्या उद्याच्या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, पवार म्हणतात ‘ते’ दाखवण्याची गरज आहे का ?
'१४ एप्रिलनंतर महानगरं आणि बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागातील लॉक डाऊन उठवावे'
आमदार साहेब गोरगरिबांच्या अन्नात माती कालवू नका, राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद आला चव्हाट्यावर
संतापजनक : तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माझा सलाम ; या दिग्गज कलाकाराने केलं कौतुक
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका