रस्त्यावरील खड्यांविरोधात आता सुप्रिया सुळेंच ‘सेल्फी लेलो’ अभियान 

टीम महाराष्ट्र देशा: खेडी असो वा शहरे सर्वच ठिकाणचे रस्ते खंड्यानी भरभरून गेले आहेत. वाहन चालकांना खड्यातून रस्ता शोधत वाहन चालवण्याची कसरत करावी लागत आहे. तर दररोज शेकडो अपघात होत आहेत. मात्र तरीही राज्यात खड्डे दाखवा आणि हजार रुपये मिळवा अस आवाहन सरकारमधील मंत्री करत आहेत. आता या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून एक अनोख आंदोलन छेडल जाणार आहे.

१ नोव्हेंबर रोजी रस्त्यावरील खंड्यासोबत सेल्फी काढलेले फोटो सोशल मिडीयावर अपलोड करून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना फेसबुक आणि ट्विटर वर टॅग करण्याच आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसकडूनकरण्यात आल आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या फेसबुकवर याची माहिती टाकलेली आहे.

You might also like
Comments
Loading...