राष्ट्रवादीने दिला बुलढाण्यात उमेदवार, तुपकरांचा पत्ता कट ?

raju shetty and ravikant tupkar

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रातील 48 पैकी 22 जागांवर निवडणूक लढणार आहे. त्यातील 10 जागांवर उमेदवार आणि हातकणंगलेच्या जागेवर राजू शेट्टींना पाठिंबा राष्ट्रवादीने जाहीर केला.

शेट्टी यांची यासंदर्भात कालचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते अहमद पटेल, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याशी फोनवर चर्चा झाली. शेट्टी यांच्यासाठी हातकणंगलेची जागा सोडण्यात आली आहे.

दरम्यान,संघटनेकडून आग्रह धरण्यात आलेल्या बुलढाणा लोकसभेसाठी मात्र राष्ट्रवादीने स्वतःचा उमेदवार दिला आहे. स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्यासाठी मागण्यात आलेली बुलढाणा लोकसभा संघटनेला मिळण्याची शक्यता मावळली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार

सुप्रिया सुळे- बारामती

Loading...

उदयनराजे भोसले- सातारा

धनंजय महाडिक- कोल्हापूर

Loading...

संजय दिना पाटील -उत्तर पूर्व मुंबई

Loading...

सुनील तटकरे- रायगड

राजेंद्र शिंगणे- बुलढाणा

गुलाबराव देवकर- जळगाव

राजेश विटेकर- परभणी

आनंद परांजपे- ठाणे

बाबाजी पाटील- कल्याण

मोहोम्मद फैजल- लक्षद्वीप