fbpx

बीडमध्ये पुतण्याने काकाला लोळवले !

टीम महाराष्ट्र देशा : बीड नगरपालिकेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. मात्र या निवडणुकीत उमेदवारांच्या लढाईपेक्षा काका-पुतण्याची लढाईकडेचं राज्याचे लक्ष लागले होते. कारण या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने निवडणुकीची सर्व जबाबदारी पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्याकडे दिली होती. म्हणूनच जयदत्त क्षीरसागर यांना अपक्ष उमेदवार उभा करावा लागला.

याठिकाणी प्रमुख लढत ही संदीप क्षीरसागर यांच्या गटाविरोधात जयदत्त क्षीरसागर यांच्या उमेदवारांमध्ये होती. या निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी आपली पूर्ण ताकद उभी केली होती, तर विरोधात काका जयदत्त क्षीरसागर यांचा उमेदवार होता. राष्ट्रवादीकडून मोमीन खमरुनिस्सा शरीफोद्दीन या उमेदवार होत्या तर जयदत्त क्षीरसागर यांनी अपक्ष उमेदवार उभा केला होता. शिवणयंत्र चिन्हावर शेख समीरा बेगम खमर निवडणुकीच्या रिंगणात उभ्या होत्या.

बीड नगरपालिकेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक पार पडली, ज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोमीन खमरुनिस्सा शरीफोद्दीन यांना 1039 मतं मिळाली तर अपक्ष उमेदवार शेख समीरा बेगम खमर यांना 754 मतं मिळाली. बीड शहरातील प्रभाग क्र.11 अ मधील पोटनिवडणुकीत एका जागेसाठी सात उमेदवार रिंगणात होते.

1 Comment

Click here to post a comment