राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार म्हणतो, अजित पवारांची मनस्थिती तपासण्याची गरज…

टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी मला बोलावून उमेदवारी दिली आहे. अपक्ष उमेदवाराला पाठींबा देयचा होता, तर मग मला उमेदवारी का दिली ?, असा सवाल करमाळा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार संजय पाटील घाटणेकर यांनी केला आहे. तसेच अजित पवार यांची मनस्थिती तपासण्याची गरज असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.

विधानसभेसाठी प्रचाराला सुरुवात झाली आहे. मात्र, आद्यपही राष्ट्रवादी काँग्रेसमधील घोळ संपताना दिसत नाही. पक्षाकडून करमाळ्यात संजय पाटील घाटणेकर तर संगोल्यामध्ये दीपक साळुंखे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. परंतु बुधवारी पत्रक काढत दोघांचीही उमेदवारी रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना राष्ट्रवादीने करमाळामध्ये पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, पक्षाकडून अशा प्रकारे पत्रक काढण्यात आल्याने घाटणेकर आक्रमक झाले आहेत. शिंदे यांना पाठिंबा दिल्याचं पसरवले जात आहे. मात्र, मला शरद पवार अथवा अजित पवार यांचा फोन आलेला नाही. अजित पवार हे साफ खोटं बोलत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या