महामंडळ मिळताच राष्ट्रवादीचे नरेंद्र पाटील भाजपात ?

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विधानपरिषद सदस्य आणि माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. ते भाजपात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.

नुकताच जाहीर झालेल्या महामंडळ नियुक्त्यांमध्ये नरेंद्र पाटील यांच्याकडे अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे पाटील हे भाजपात जाणार असल्याचे निश्चित मानले जात होते. पाटील यांनी पक्ष सदस्यत्व आणि महाराष्ट्र प्रदेश लेबर सेलच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्यानंतर भाजपात प्रवेश केला. त्यावेळी पाटील हे डावखरेंबरोबर भाजपा मुख्यालयात उपस्थित होते. पण डावखरे हे आपले चांगले मित्र असल्यामुळे आपण भाजपा मुख्यालयात उपस्थित असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी त्यावेळी केले होते. तेव्हापासूनच पाटील हे भाजपात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते.