शरद पवारांनी उमेदवारी जाहीर केलेल्या ‘या’ महिला नेत्या भाजपच्या गळाला

blank

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी पक्षाने तिकीट जाहीर करूनही राष्ट्रवादीच्या महिला नेत्या भाजपच्या गळाला लागल्याचे वृत्त समोर येत आहे. कारण राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी केज मतदारसंघातील नमिता अक्षय मुंदडा यांना राष्ट्रवादी कडून तिकीट जाहीर केले आहे. मात्र नमिता मुदंडा यांनी केलेल्या फेसबुक पोस्ट वरून त्या भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे.

नमिता अक्षय मुंदडा या राष्ट्रवादीतूनच निवडणुक लढणार आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांनी मतदारांना आशिर्वाद मागणाऱ्या पोस्ट तर केल्या आहेत, परंतु यावर ना पक्षाचे चिन्ह आहे ना पवारांचा फोटो आहे. त्यामुळे नमिता मुदंडा या भाजपच्या गळाला लागले असल्याचे सांगितले जात आहे.

blank

दिवंगत लोकनेत्या डॉ. विमल मुंदडा यांच्या स्नुषा असलेल्या नमिता मुंदडा मागच्या वेळी केज मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढल्या होत्या. मोदी लाट आणि दिवंगत मुंडेंची सहानुभूती त्यावेळी भाजपची जमेची बाजू तर होतीच. शिवाय मुंदडांच्या पराभवाला राष्ट्रवादीनेही मोठा हातभार लावला होता. तरीही मुदंडा या निवडणून आल्या होत्या.

दरम्यान मागच्या आठवड्यात जिल्हा दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पाच उमेदवार जाहीर केले. यात केजमधून नमिता मुंदडा यांचा समावेश होता. परंतु, त्यानंतर त्यांच्यासह पती अक्षय मुंदडा व सासरे नंदकिशोर मुंदडा यांच्या फेसबुक पोस्टवरील आवाहने पाहीली तर त्यांना राष्ट्रवादीकडून निवडणुक लढवायची आहे का, अशी शंका येते.