जिल्हा नियोजन मंडळासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून एकमताने उमेदवार देणार – पगार

ravindra pagar nashik

नाशिक: जिल्हा नियोजन मंडळाच्या निवडणुकीसाठी जिल्हा पस्य व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून एकमताने उमेदवार दिले जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांनी दिली आहे. आज राष्ट्रवादी भवन या पक्ष कार्यालयातील आपल्या दालनात कार्यकर्ते, पदाधिकारी व उपस्थित जिल्हा परिषद सदस्यांशीरीक चर्चेप्रसंगी अॅड. रविंद्र पगार बोलत होते.

जिल्ह्याच्या विकास आराखडयाचे नियोजन करणाऱ्या नियोजन मंडळाच्या निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या निवडणुकीत सर्वाना विश्वासात घेऊन एकमताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उमेदवार दिले जातील असे यावेळी अॅड. रविंद्र पगार यांनी सांगितले. सत्तारूढ होण्यापूर्वी भाजप-शिवसेना युती सरकारने जनतेला ‘अच्छे दिन’सह अनेक आश्वासने व स्वप्ने दाखविली होती. या खोटया स्वप्नांना व भुलथापांना बळी पडत जनतेने भाजप-शिवसेना युतीला बहुमत देत सत्तेत स्थान दिले होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असतांनाही निवडणुकीपूर्वी दिलेल्या कोणत्याच आश्वासनांची पूर्तता मोदी सरकारने ३ वर्षाच्या कार्यकाळात केलेली नाही.

Loading...

जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकाही वेळेत व नियमित होत नसल्याने जिल्ह्याचा विकास खुंटला असून नव्याने निवडून जाणाऱ्या सदस्यांना याबाबत संघर्षाची भूमिका नियोजन मंडळात घ्यावी लागेल असेही अॅड. रविंद्र पगार यांनी सांगितले. या सरकारच्या काळात शेतकरी मोठया प्रमाणावर आर्थिक अडचणीत सापडलेला असून कर्जबाजारी झाल्याने मोठया प्रमाणात आत्महत्येकडे वळत आहे. कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणे गरजेचे होते. परंतु शब्दांचे खेळ केल्याने शेतकऱ्यांना कर्ज माफीचा फायदा मिळत नसल्याचे वाढत्या शेतकरी आत्महत्यांवरून दिसत असल्याचे देखील अॅड. रविंद्र पगार यावेळी बोलतांना म्हणाले.

यावेळी विष्णुपंत म्हैसधुणे, यशवंत शिरसाठ, सोमनाथ खातळे, बाळासाहेब पानसरेमुकुंद फडोळ, अशोक वायचळे, दिक्षीराम म्हैसधुणे, संपतराव आहेर, राहुल कमानकर, युवराज पाटील, विशाल गांगुर्डे, विजय सोनवणे, साहेबराव पवार, प्रमोद बनकर, शांताराम ठुबे, सुधाकर काळे, राजेश हगवने आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांची गुंडगिरी, 'इंडियन ऑईल'च्या अधिकाऱ्यांना केली हाणामारी
#शिवभोजन : ज्यांची ऐपत आहे त्यांनी 'शिवभोजन' घेऊ नये : अजित पवार
मराठा क्रांती मोर्चाचा पहिला बळी ' मी ' ठरलो : आमदार भारत भालके
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश