सुप्रिया सुळेंना धक्का, बारामतीमधीलं राष्ट्रवादीचा निरीक्षकच भाजपमध्ये दाखल

बारामती: बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे विरुद्ध भाजपच्या कांचन कुल असा सामना रंगला आहे. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेच बारामतीमधील सुप्यामध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं होत, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस  बारामतीचे निरीक्षक राहुल शेवाळे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीच्या निरीक्षकानेच भाजप प्रवेश केल्याने सुप्रिया सुळे यांना धक्का मानला जात आहे.

राहुल शेवाळे हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष देखील आहेत. काही दिवसांपासून त्यांच्याकडे बारामती मतदारसंघाच्या निरीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली होती. एका बाजूला सुळे या प्रचारासाठी मतदारसंघात फिरत असताना शेवाळे यांचा भाजप प्रवेश राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागणारा आहे.

दरम्यान, यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राष्ट्रवादीच्या कॅप्टनने आधी मैदानात उतरून पुन्हा माघार घेतली, त्यांची माघार हा भाजपचा पहिला विजय आहे.