fbpx

विधानपरिषद निवडणुक: भाजपला शह देण्यासाठी शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी एकत्र ?

टीम महाराष्ट्र देशा: विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेला सोबत घेण्यासाठी भाजपने नारायण राणे यांना उमेदवारी देण्याच टाळल आहे. मात्र तरीही भाजप आणि मुख्यमंत्र्यांना शह देण्यासाठी शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेकडून एखादा अपक्ष उमेदवार मैदानात उतरवून त्याला कॉंग्रेस- राष्ट्रवादीने पाठींबा देण्याबाबत गुप्त बैठक झाल्याच बोलल जात आहे.

विधानपरिषद निवडणुकीत कॉंग्रेस राष्ट्रवादीकडे पुरेशे संख्याबळ नसल्याने भाजप- शिवसेना युतीने एकत्र येत उमेदवार दिल्यास तो सहजतेने विजयी होवू शकतो. मात्र सध्या भाजप – शिवसेनेमध्ये सुरु असणारा कलगीतुरा आणि वरचढ होणारे मुख्यमंत्री फडणवीस यांची कोंडी करण्यासाठी अपक्ष उमेदवार मैदानात उतरवण्याची तयारी सुरु आहे.