‘भाजप लागलंय लुटायला पीएमपीएल काढलीय विकायला’

कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे पीएमपीच्या खासगीकरणाविराेधात अांदाेलन

पुणे : पीएमपीएलचे काही मार्ग हे खाजगी ठेकेदारामार्फत चालविण्यात यावेत या भाजप शहराध्यक्षांच्या भूमिकेविरोधात कॉंग्रेस आघाडीच्या वतीने पीएमपीएलच्या मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप लागलंय लुटायला पीएमपीएल काढलय विकायलाच्या घोषणा अश्या घोषणा देण्यात आल्या यावेळी विरोधी पक्ष नेते चेतन तुपे, कॉंग्रेस गटनेते अरविंद शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा रुपाली चाकणकर, सुभाष जगताप, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे आदी उपस्थित होते

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे शहाराध्यक्ष योगेश गोगावले यांनी पीएमपीच्या तीन मार्गांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सत्ताधारी पक्ष तसेच पीएमपीएमएल प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच फायद्यातलेच तीन मार्ग खासगीकरणासाठी का निवडण्यात आले असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला.

Shivjal