अजितदादांनी करून दाखवलं : …तर पवारांची अवलाद सांगणार नाही; दिलेला शब्द खरा केला

बारामती : निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बाजी मारली आहे. 21 पैकी 18 जागांचे निकाल जाहीर झाले असून राष्ट्रवादी पुरस्कृत निळकंठेश्वर पॅनलला 13 जागांवर विजय मिळाला आहे, तर सत्ताधारी चंदरराव तावरेंच्या पॅनेलला पाचच जागा मिळवण्यात यश आलं आहे.

तसेच या निवडणुकीत 21 जागांसाठी या दोन्ही पॅनलसह अन्य 14 अपक्ष असे एकूण 56 उमेदवार रिंगणात आहेत. 23 फेब्रूवारीला या निवडणुकांसाठी मतदान झालं असून 224 तारखेपासून मतमोजणी सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यावेळी आपला मतदान हक्क बजावला होता.

Loading...

याचप्रमाणे गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील सहकारी साखर कारखानदारीत चर्चेत असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत उपमुख्यमंत्री पवार यांनी विजयश्री खेचून आणली. या कारखान्यावर विजय मिळवला नाही तर पवारांची अवलाद सांगणार नाही, अशा शब्दांत अजितदादांनी आव्हान स्वीकारले होते.

दरम्यान, माळेगाव हा शरद पवार यांचा कारखाना म्हणूनच ओळखला जातो. शरद पवार हे या कारखान्याचे सभासद आहेत. आतापर्यंत 1997 आणि 2015 च्या निवडणुका वगळता या कारखान्यावर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. मात्र मागील निवडणुकीपूर्वी केंद्र आणि राज्यातील सत्ता गेल्यानंतर माळेगाव कारखानाही राष्ट्रवादीच्या हातून गेला होता.

2015 मध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढून कारखाना ताब्यात घेण्यासाठी अजित पवार यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवायची, असा चंगच अजित पवारांनी बांधला होता.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
तळीरामांना दारूवाचून राहावेना; पठ्ठ्यांनी 'यूट्यूब'वर पाहून घरीच तयार केली दारू
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
अमेरिकेत 'कोरोना'चं थैमान; डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींकडे मागितला 'मदतीचा हात'
... तर 'लॉकडाऊन'चा कालावधी वाढवावा लागेल; राजेश टोपे यांची माहिती