बारामतीकरांनो कोणीही घराबाहेर न पडता ‘बारामती पॅटर्न’चा आदर्श राज्यासमोर घालून द्या – अजित पवार

ajit pawar

बारामती : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. आतापर्यंत हजारों लोकांना यामुळे जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्रातही या रोगोने थैमान घातले आहे. कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

बारामतीतही कोरोनाने आता शिरकाव केला आहे. न्यूमोनियाचे उपचार घेणारा रुग्ण ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आढळला आहे. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांना कोणीही घराबाहेर न पडता संयमाच्या ‘बारामती पॅटर्न’चा आदर्श राज्यासमोर घालून देण्याचे आवाहन यांनी केले आहे.

पुढे बोलताना पवार यांनी ‘कोरोना’चे संकट संपूर्ण जगावर घोंगावत आहे. आपल्या राज्यातही आलेले हे संकट आता आपल्या दारात आले आहे. बारामतीत सापडलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी तयार करण्याचे काम सुरु आहे अशी माहिती दिली आहे.

दरम्यान, जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतात हा आकडा 1100 च्या वर पोहोचला आहे. तर महाराष्ट्रात हा आकडा 200 च्या वर पोहोचलेला आहे. या जीवघेण्या रोगाचा संसर्ग थांबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपुर्ण देशात लॉकडाउनची घोषणा केलेली आहे.