fbpx

‘राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दात तुटेपर्यंत मारले जात आहे’

dhananjay munde

जामनेर : सत्तेचा दुरूपयोग करुन जामनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे. दात तुटेपर्यंत मारले जात आहे. आता तुमचे थोडेच दिवस आहे. आम्ही सत्तेत येऊ तेव्हा तुम्हाला पळता भुई थोडी होईल. मग तुमचं कसं होईल बघा, चून-चून के……..! अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विरोधकांवर केली. ते जामनेर येथील राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेत बोलत होते.

राष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन यात्रा चालू आहे. या परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेशी सवांद साधला जात आहे.

यावेळी धनंजय मुंडे म्हणले, ‘जामनेर नगरपालिकेचा निकाल खरंतर लोकशाहीची हार होती. ती लढाई होती धनशक्ती विरोधात जनशक्ती. पैसा, इव्हीएम घोटाळा हे समीकरण जुळलं होतं. झोल्यामध्ये पैसे जमा करणाऱ्या पक्षाच्या येथील मंत्र्यांकडे एका मताला हजारो रूपये मोजण्याची ऐपत कुठून आली?’.

येथील स्थानिक मंत्र्यांनी वाचाळता केली, बारामती जिंकून दाखवेन. नखाची तरी सर आहे का? जामनेरचे एक गाव तरी आदर्श करून दाखववा. अहो, जामनेरकरांना साधं पिण्याच पाणी सुद्धा देऊ शकत नाही तुम्ही. काहीही करा पण बारामतीचा नाद करू नका, असही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.