fbpx

ब्रेकिंग : मुंबई महापालिकेच्या मुख्यप्रवेशद्वारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

टीम महाराष्ट्र देशा : मुंबई महापालिकेच्या उपायुक्त चौधरी यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे चौधरींवर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित निधी चौधरी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.

त्यानंतर आता मुंबई महापालिकेच्या मुख्यप्रवेशद्वारावर राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन सुरु केले आहे. महापालिका उपायुक्त निधी चौधरींना बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने हे आंदोलन सुरु केले आहे. निधी चौधरी यांनी १७ मे रोजी महात्मा गांधींविषयी वादग्रस्त ट्वीट केलं होतं .